*शिवभोजन थाळी सुरू करून मुख्यमंत्र्यांनी सुदाम्याचे पोहे नागरिकांना उपलब्ध केले- डॉ. नीलमताई गोर्हे* *माँसाहेब मीनाताई ठाकरे माता सन्मान योजने अंतर्गत खाद्यमहोत्सवाचे आयोजन*

Share This News

येरवडा, पुणे: माँसाहेब मीनाताई ठाकरे माता सन्मान योजने अंतर्गत पुणे येरवड्यात शिवसेना उपशहर प्रमुख आनंद गोयल यांच्या वतीने खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारचे पोहे किंवा पोह्यांपासून बनवलेल्या शाकाहारी पदार्थांचा विषय सहभागी महिलांना देण्यात आला होता. महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ४५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्हे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेविका श्वेता चव्हाण, माजी नगरसेवक सागर माळकर, राजेंद्र शिंदे, सुनील जाधव, शांताराम खलसे, कविता आमरे, संजय भालेराव, रवी अगरवाल, राजाभाऊ चौधरी, शितोळे, काँग्रेसच्या ज्योती चंदेवळ, किशोर पाटील, शशी देवकर, अनिल टिंगरे, अमृता पठारे, अनिता परदेशी, यशवंत शिरके, शिवाजी वाडघूले, शशी सटोटे उपस्थित होते. शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या खाद्य महोत्सवातील सहभागी महिला स्पर्धकांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारे पोह्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. सदर स्पर्धेत परीक्षकांच्या निर्णयानुसार प्रथम क्रमांक सौ. निलम आवटे, द्वितीय क्रमांक शनाया अगरवाल, तिसरा सिमा नलावडे, चौथ्या क्रमांकावर माला मुंगशे तर पाचव्या क्रमांक स्मिता लोंढे यांनी पटकवला. महोत्सवाचे आयोजक आनंद गोयल यांच्या वतीने विजेत्यांना अनुक्रमे प्रथम बक्षीस वाशिंग मशीन, द्वितीय ३२ इंची एलईडी टीव्ही, तृतीय रेफ्रिजरेटर, चौथे ओव्हन तर पाचव्या क्रमांकाला मिक्सर तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सोबतच सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेट वस्तूंचे वाटप आयोजकांच्या वतीने देण्यात आले. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवभोजन थाळी सुरू करून सुदाम्याचे पोहेच नागरिकांना उपलब्ध केले आहेत. आज मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने होत असलेल्या या कार्यक्रमाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी हा कार्यक्रम आयोजित करून मासाहेबांची आठवण करून दिली. सोबतच विजेत्यांचे अभिनंदन व आनंद गोयल व त्याच्या सर्व सहकार्यांचे कौतुक गोर्हे यांनी यावेळी केले. सदर खाद्य महोत्सवाती पदार्थांचे परिक्षण माधवबागच्या डॉ. अमृता वाडेकर, डॉ.पल्लवी शिंदे, नेहा वाडेकर, दीपाली कऱ्हाडकर पूर्णब्रम्हच्या अर्चना भिडे , नीता मरकळे, मोघे कॅटरिंगच्या सायली मोघे यांनी केले होते.