कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक वधूवरांनी एकत्र येण्यासाठी ऑनलाइन परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त नामदेव आंतरपाट संस्थेच्या वतीने भारतातील शिंपी समाजाचे संघटन व विवाह इच्छुक मुले व मुली आणि त्यांच्या पालकांसाठी पुणे शहरातील शिंपी समाजातील संस्थांच्या सहकार्याने “आंतरपाट” ३७ वा भव्य राष्ट्रीय ऑनलाइन वधू-वर परिचय मेळावा रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ५.३० या वेळात गुगल मिट द्वारे होणार आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले फॉर्म गुरुवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यन्तपाठवावेत.यात नामदेव,भावसार,अहिर,रंगारी,वैष्णव,महेश्वरी,तेलगू,मेरू,निराळी,छिप्पा,छत्री ,दर्जी या शिंपी पोटजातीतील वधूवर सहभागी होवू शकतील संपर्क mohanbasale282@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन उपाध्यक्ष अॅड.दिलीप निरगुडे व सचिव मोहन बसाळे यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
समस्त नामदेव आंतरपाट संस्थेच्यावतीने ऑनलाइन वधू-वर मेळावा.
You Might Also Like

*चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला उकळत्या तेलातून 5 रुपयाचे नाणं बाहेर काढण्याची शिक्षेवरून,असं उकळत्या तेलातून नाण काढणं अशी शिक्षा देणारी लोक आहेत यांच्यावरती कारवाई व निर्बंध आवश्यक ना-डॅा.नीलम गोऱ्हे.*

ब्रावो वॉरियर्स व रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने गरजू ग्रामस्थाना वापर करण्यासाठी फ्लेक्सचे वाटप.
