ब्रिविथ इंजिनिअरिंग एलएलपी : पाण्यासाठी शाश्वत,आरोग्यदायी आणि स्मार्ट उपायांची दिशा.

Share This News

पुणे (दि.२९) सध्या पावसाचे दिवस असून पाणी अनेकदा अशुद्ध व रोगजंतू युक्त असते. शुद्धीकरण प्रक्रियेतून गेलेले पाणी सुद्धा काही वेळा पूर्ण शुद्ध झालेले नसते परिणामी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या अनुषंगाने जलशुद्धीकरण तंत्रज्ञानामध्ये नाविन्यपूर्ण योगदान देणारी ब्रिविथ इंजिनिअरिंग एलएलपी (Brivith Engineering LLP) ही कंपनी जलप्रक्रिया क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. ही कंपनी आरओ प्लांट (RO Plant), सॉफ्टनर प्लांट(Water Softener), सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट(STP), आणि एफ्ल्युएंट ट्रिटमेंट प्लांट(ETP) यांसारख्या आधुनिक आणि पर्यावरणपूरक पाणी प्रक्रियेसाठी अत्याधुनिक उत्पादने बनवत आहे. कंपनीने अल्प कालावधीत दर्जेदार उत्पादन, कमी वीज वापर, आणि झिरो वॉटर वेस्टेज यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे विविध औद्योगिक आणि वाणिज्यिक क्षेत्रात विश्वास निर्माण केला आहे. आधुनिक आयोनायजेशन टेक्नोलॉजी टेक्नोलॉजीचा वापर करून ब्रिविथने सॉफ्ट वॉटर सोल्युशन्समध्ये नाविन्य दाखविले आहे. जे त्वचेला व केसांना हानी न करता वापरण्यायोग्य पाणी देतात. ब्रिविथ इंजिनिअरिंग एलएलपीचा उद्देश म्हणजे ग्राहकांना जलशुद्धीकरणासाठी सुलभ, किफायतशीर आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपाय पुरविणे. कंपनीने महाराष्ट्रासह भारतभर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. जागतिक दर्जाचे प्रोडक्ट्स, अनुभवी टीम, आणि व्यावसायिक सेवा हे ब्रिविथचे बलस्थान आहे. “शुद्ध पाणी,शाश्वत पर्यावरण”या ध्येयासोबत ब्रिविथ ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड सोल्युशन्स पुरवत आहे. यामुळे मराठी उद्योजकाने उभी केलेली ही ब्रिविथ कंपनी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
BRIVITH ENGINEERING LLP