पुणे (दि.१४) याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांचे प्रथम वर्धापनदिनानिमित्त “गुणगौरव सोहळा”व मातृदिन समारंभ नुकताच संपन्न झाला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह यथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व बुके देवून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मा.बिशप आयवळे, कोल्हापूर. मा.आमदार हेमंतजी रासने, शिवकामगार सेना प्रमुख सुधीर कुरुमकर, डॉ.विनोद गुडे, प्राचार्या प्रतिमा म्हंकाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. १३ विविध पुरस्कार व १२ आदर्श मातांना गौरविण्यात आले. यात सुसंस्कृत राजकारणी पुरस्कार माजी नगरसेविका स्नेहलताई पाडळे, खेलरत्न पुरस्कार संदेश बोर्डे, संदेश रत्न पुरस्कार पा.रॉबिन महाडकर, विशेष कलागौरव पुरस्कार मा. मृदुलाताई घोडके यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अनिल गडकरी यांनी केले.
अध्यक्ष नितीन गोर्डे यांनी अहवाल वाचन करून आभार व्यक्त केले.
छायाचित्र : पुरस्कार प्रसंगी मान्यवर.