*”आदी संस्कृती महोत्सव २०२५”* पुणे, दिनांक १३ ते १७ मे २०२५:

Share This News

युनिव्हर्सल ट्राइब्स आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (DICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आणि ऐतिहासिक सांस्कृतिक उपक्रम “आदी संस्कृती महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १३ मे ते १७ मे २०२५ या कालावधीत पुणे शहरात गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट पुणे पार पडणार असून, भारतातील पारंपरिक आदिवासी जीवनशैली, कला, संस्कृती, अन्न, संगीत, नृत्य आणि उद्योजकतेचे दर्शन घडवणारा एक अद्वितीय महोत्सव ठरणार आहे.
या महोत्सवाचा उद्देश भारतातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाला एक नवे व्यासपीठ देणे, त्यांच्या कलेला बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे. विविध राज्यांतील सुमारे २० हून अधिक आदिवासी जमाती या महोत्सवात सहभागी होणार असून, त्यांच्या अनोख्या परंपरा, आस्थापन, कलेचा आणि कौशल्याचा अनुभव पुणेकर जनतेला घेता येणार आहे. २०० हून स्टॉल ५०० अधिक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत आर्टिस्ट तसेच . या महोत्सवामध्ये विविध आदिवासी कलांच्या कार्यशाळा ही होणार आहेत त्याच बरोबर विविध प्रकारचे कार्यक्रम जसे की उद्योजक्ता विकास, स्टार्ट आप मीट व काही विशेष सतरांचे आयोजन करणार आहेत आहेत .

दररोजचे कार्यक्रम आणि आकर्षणांचे तपशीलवार वर्णन:
१३ मे २०२५ – उद्घाटन सत्र :
पहिल्या दिवशी महोत्सवाची सुरुवात आदिवासी वाद्यांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषा आणि स्वागत नृत्यांच्या सादरीकरणाने होईल. या कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन हे पद्म श्री डॉ. मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष डिककी यांच्या हस्ते होईल. उद्घाटन समारंभात केंद्र व राज्यस्तरीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी प्रतिनिधी, उद्योजक आणि DICCI व Universal Tribes चे पदाधिकारी उपस्थित राहतील. शेवटच्या दिवशी एकत्रित आदिवासी नृत्य-गायन स्पर्धा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, तसेच आदिवासी उद्योजकांसाठी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

१४ मे २०२५ – हस्तकला व वनउत्पादने प्रदर्शन:
या दिवशी विविध राज्यांतील आदिवासी हस्तकला व शिल्पकलेचे प्रदर्शन होईल. बाँबूपासून तयार केलेल्या कलाकृती, ढोकरा धातुकला, गोंद चित्रकला, वारली पेंटिंग, आदिवासी शिल्प हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असतील. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या विविध अन्न पदार्थाचा आस्वाद घेत येईल

या दिवशी विविध पारंपरिक आदिवासी कलांच्या कार्यशाळा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. यात वारली चित्रकला, गोंद आणि मंडहुबणी या चित्रकालांचे समावेश असतील. सहभागी नागरिकांना या कार्यशाळांमधून प्रत्यक्ष कलेचा अनुभव घेण्याची संधी मिळेल, तसेच आदिवासी संस्कृतीच्या सौंदर्यशास्त्राचा आणि तंत्रज्ञानाचा परिचय होईल.

१५ मे २०२५ – विशेष मार्गदर्शन व पोडकास्ट सत्र :
या दिवशी एक अत्यंत मान्यवर आणि विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री, माननीय प्रा. डॉ. अशोक उईके स्वतः उपस्थित राहून सहभागी होणार आहेत. या सत्रात ते आदिवासी समाजाच्या समग्र विकासासाठी सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देतील, तसेच आदिवासी उद्योजकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा व अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करतील. हे सत्र आदिवासी तरुण-तरुणींना प्रेरणा देणारे व मार्गदर्शक ठरेल.
याच दिवशी, आजच्या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या आणि सामाजिक बदलांवर केंद्रित असलेल्या “अमुक तमुक” या सुप्रसिद्ध पॉडकास्टच्या लाईव्ह रेकॉर्डिंग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या लाईव्ह पॉडकास्टमध्ये आदिवासी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, आणि पारंपरिक ज्ञान जपणारे मान्यवर सहभागी होणार असून, ते आपल्या अनुभवांद्वारे एक समृद्ध आणि प्रेरणादायी संवाद साकारतील.
१६ मे २०२५ – आदिवासी उद्योजकता :
१६ मे २०२५ रोजी सकाळच्या सत्रात आदिवासी उद्योजकतेला चालना देण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे
पहिली कार्यशाळा “Opportunities for Tribal Start-Ups” ही नवउदयोन्मुख आदिवासी उद्योजकांसाठी एक मौल्यवान संधी आहे. या सत्रात आदिवासी समुदायासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदान योजना, सहकार्य कार्यक्रम आणि भांडवली मदतीबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.
दुसरी कार्यशाळा “Chat with CA” ही आर्थिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. या सत्रात एक अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट (CA) सहभागी होऊन लघु व मध्यम व्यवसायांमध्ये आर्थिक नियोजनाचे महत्त्व, खर्चाचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतील. सहभागी उद्योजकांना आपले वैयक्तिक प्रश्न थेट विचारण्याची संधी मिळणार असून, कर व्यवस्थापन, व्यवसाय नोंदणी, जीएसटी आणि आयकर विवरणपत्र यांसारख्या बाबी अधिक स्पष्ट होतील.
या दोन्ही कार्यशाळा आदिवासी समुदायातील भावी उद्योजकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतील, आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासाच्या सुरुवातीस एक भक्कम पाया प्रदान करतील.

१७ मे २०२५ – समारोप सत्र :
शेवटच्या दिवशी एकत्रित आदिवासी पोषयांखाचे प्रदर्शन आयोजित केले असून समारोप कार्यक्रमात DICCI व Universal Tribes चे वरिष्ठ पदाधिकारी, सरकारी प्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

महोत्सवाचा उद्देश व सामाजिक संदर्भ:
“आदी संस्कृती महोत्सव २०२५” केवळ एक सांस्कृतिक सोहळा नसून, आदिवासी समाजाला आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या सशक्त बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे.
DICCI च्या “उद्योगातून सामाजिक उत्थान” या संकल्पनेनुसार, आणि Universal Tribes च्या “आदिवासी स्वयंपूर्णतेचा आत्मा” या ध्येयाशी सुसंगत असा हा उपक्रम आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या पारंपरिक कौशल्यांना व्यावसायिक रूप देऊन, त्यांना नव्या बाजारपेठांमध्ये सहभागी करून घेण्याची संधी निर्माण होत आहे.

सर्वांसाठी आमंत्रण:
हा महोत्सव सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, उद्योजक, उद्योग संस्था, संशोधक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी खुला आहे.
एकत्र येऊन आपण आपल्या मूलगामी आदिवासी परंपरेचा गौरव करूया आणि समावेशक विकासाची दिशा ठरवूया.

या प्रेस कॉन्फरन्स मध्ये श्री. रमेश रघतवान -निवृत्त अधिकारी, टीआरटीआय , श्रीमती मैत्रेयी कांबळे – राष्ट्रीय संयोजक, DICCI नेक्स्टजेन तसेच श्री. रजत रघतवान – सीईओ, युनिव्हर्सल ट्राइब्स इत्यादी सर्व उपस्थित होते