रोटरीची स्मार्ट पाठशाळा.प्रकल्प संपन्न.

Share This News

पुणे (दि.८)रोटरी क्लब एनआयबीएम च्या वतीने रोटरी क्लब चाकण आणि रोटरी क्लब राजगुरुनगर यांच्या सहकार्याने चाकण आणि खेड परिसरातील ८ शाळांसाठी रोटरीची स्मार्ट पाठशाळा हा प्रकल्प राबविण्यात आला. यामध्ये ई – लर्निंग सेट,उपकरणांसह विज्ञान प्रयोगशाळा सेटअप, प्री –फॅब्रिकेटेड स्वच्छतागृहे, आरओ मशिनसह वॉटर प्युरीफायर प्रदान करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विशेषतः एआय टूल्सचा(Artificial Intelligence)वापर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रकल्पाला नेक्स्टइयर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने CSR निधी दिला. प्रकल्पाचे उद्घाटन प्रांतपाल शितल शहा व नेक्स्टइयर कंपनीचे संचालक मनीष बसनाले यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब एनआयबीएमचे अध्यक्ष नितीन करंदीकर, चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन अजित वाळिंबे यांनी प्रस्तावना व चित्रफित द्वारे प्रकल्पाची माहिती दिली. श्री बसनाळे व प्रांतपाल शितल शहा यांनी मनोगत व्यक्त केले. आभार डॉ.अमोल बेनके यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक तुकाराम कुटे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे, रोटरी क्लब एनआयबीएमचे सदस्य, रोटरी प्रांत ३१३१चे मान्यवर अधिकारी आणि शाळांचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
छायाचित्र : कार्यक्रम प्रसंगी मान्यवर.