जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उदघाटन

Share This News

पुणे (दि.१) जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे विभागाच्या वंदना कोचुरे यांच्या हस्ते संपन्न झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी निरीक्षक दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे मधुकर काटवटे(से.नि) ,महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबईचे नंदकुमार फुले(से.नि), विशेष पाहुणे अध्यक्ष प्रहर दिव्यांग क्रांती संस्था आंदोलन, पुणेचे धर्मेंद्र सातव पाटील, जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकारी रोहिणी मोरे. आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, अशासकीय संस्थांचे व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी मान्यवर.