श्री प्रसाद कुलकर्णी यांचा पुणे मॅनेजमेंट असोसिएशन कडून सत्कार संपन्न.
श्री प्रसाद कुलकर्णी यांचा पुणे मॅनेजमेंट असोसिएशन कडून सत्कार संपन्न.
Share This News
पुणे (दि.२८) पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्थापनादिन (Foundation Day)सोहळ्याच्या निमित्ताने सॅप कंपनीचे मालक व प्रमुख वक्ते श्री प्रसाद कुलकर्णी यांचा मुख्य सत्कार पिंपरी चिंचवड येथे करण्यात आला. मुख्य सत्कार PMA चे अध्यक्ष श्री बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे, राहुल जोशी यांच्या हस्ते करत त्यांना गौरविण्यात आले. तसेच त्यांचे वर्गमित्र १९८७ बॅचचे श्रीमंत मसाळ Finolex J – Power कंपनीचे वरिष्ठ प्रकल्प अभियंता यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. समारंभा नंतर कंपनीच्या प्रगती आणि योगदानाबद्दल विस्तृत भाषण करतांना त्यांनी कंपनीच्या विकासाची महिती आणि यश यावर आधारित एक विशेष प्रदर्शन दिले, कंपनीचा विस्तार अनेक देशांत युरोप जर्मनी फ्रान्स, जपान, रशिया इत्यादी प्रदेशात पण विस्तार झालेला आहे. कार्यक्रमास अनेक उद्योजक, मान्यवर,फिनोलेक्स कंपनीचे देशपांडे, प्रिया, अग्रवाल, भाग्यश्री मॅम व इतर कंपनी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांच्या या कार्यामुळे समाजाला एक नवीन दिशा दिली असे म्हटले जात आहे. त्यांनी कंपनीच्या भविष्यातील योजना, विकास व विजयी वाटचालीबद्दल तसेच जागतिक पातळीवर अधिकाधिक मिळालेला वाव सांगितला आणि येत्या काळात मंगळवेढ्यातील सॅप कंपनीमध्ये एक हजार कर्मचारी वर्ग असणार असा विश्वास व्यक्त केला.
छायाचित्र : प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करतांना श्रीमंत मासाळ.