पुणे (दि.२८) श्री आदर्श मंडळ कॅम्प यांच्या वतीने स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचालित ४२ केंद्रांना १० स्मार्ट टीव्ही आणि २५० अभ्यास टेबलांचे वाटप करण्यात आले. विर बाजी पासलकर स्मारक सिंहगड रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी अध्यक्ष घेवरचंद सोलंकी, व सदस्य सुभाष ओसवाल, प्रताप ढलावत, अरविंद सोलंकी, अमित गेमावत, अमित शाह, राजेश जैन व अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विर बाजी पासलकर स्मारकास एक वॉटर प्युरीफायर प्रदान करण्यात आले. या कार्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत होवून त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. पर्युषण पर्वात धर्मादाय आयुक्त येथे नोंदणीकृत असलेले हे आदर्श मंडळ भक्ती – धार्मिक कार्यात मोठे योगदान देते. असे नमूद करण्यात आले आहे.
छायाचित्र : साहित्य प्रदान प्रसंगी मान्यवर.