पिरंगुट, जि पुणे येथील सॅनिटायझर कंपनीला लागलेल्या आगीत मृत पावलेल्या कुटुंबांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे…* *मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबियांच्या घेतलेल्या भेटी वेळी आश्वासन* *कंपन्यांनी कामगारांना सुरक्षितता व सुविधांसह प्रशिक्षण देणे आवश्यक… ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

Share This News

पुणे दि.०९ : पुणे येथील पिरंगुट जवळ असलेल्या सॅनिटायझर निर्माण करणाऱ्या एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत २० महिला व पुरुष कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे. आज दि.९ जुन २१ रोजी या कंपनीची पाहणी आणि कुटुंबाची भेट महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जाऊन भेट घेतली. यादरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ना.डॉ.गोऱ्हे खारवडे येथे त्या असतांनाच ताईंच्या दूरध्वनीवर फोन करून श्री ठाकरे साहेबानी मुळशीतील दु:खी कुटुंबाचे सांत्वन केले व शासन पूर्णपणे पिडीत कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. तसेच त्वरित शासनाची मदत त्वरित देण्याबाबत देखील त्यांनी प्रशासनास निर्देश दिले होते असे सांगितले .

कारखाना येथील भेटीत प्रथम ना.डॉ.गोऱ्हे यांनी मृत व्यक्तींना श्रद्धांजली व्यक्त करून कारखान्याची पाहणी करताना कंपन्यांनी कशाप्रकारे सुरक्षितता बाळगायला हवी हे सांगितले. यात प्रामुख्याने अशा दुर्घटना टाळण्यासाठी कारखान्यासाठी ज्या एस ओ पी, मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्यांची काटेकोर अंमलबजावणी सर्व कंपन्यांच्यावतीने होणे आवश्यक आहे असे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. तसेच कारखान्यांच्या सुरक्षितेचे ऑडिट स्थानिक लोकप्रतिनिधीनी सहभाग घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन तत्वे तयार करून औद्द्योगिक सुरक्षा विभागाकडून देण्याची सूचना देखील केली. तसेच कंपनीत, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे प्रशिक्षण हे एमआयडीसी आणि प्रशासनाच्या माध्यमातून कंपन्यांनी करण्याची सूचना दिली डॉ.गोऱ्हे यांनी तेथे आलेल्या कंपन्याच्या प्रतिनिधी यांना केली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने खारवडे येथील धनगर व आदिवासी वस्तीतील मृत कै. मंगल मरगळे व सुमन धेबे कुटुंबियांना ५००००हजारांची मदत देण्यात आली. यावेळी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदरे, युवासेना प्रमुख अविनाश बलकवडे, पुणे उपशहरपमुख आनंद गोयल, तालुकाप्रमुख पौंड, महिला तालुकाप्रमुख, तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक धुमाळ इत्यादी उपस्थित होते.