महाविकास आघाडीला मुळशीतील महिला भगिनींनी नाकारले.- सौ.कांताताई पांढरे.

Share This News

पुणे (दि.३०) महाविकास आघाडीला महिला भगिनींनी नाकारले,घोटावडे येथे निशिगंधा हॉल मध्ये झालेल्या महिला मेळाव्यास महिलांनी हॉल न भरल्याने पुरुषांनी हजेरी लावली तसेच हा महिला मेळावा का पुरुष मेळावा हे आता त्यांनीच पुढे येवून सांगण्याची वेळ आली आहे. अशी टिका शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ.कांताताई पांढरे यांनी केली आहे.या मेळाव्यास महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सव्वा लाखे उपस्थित होत्या. माझ्या माते महाविकास आघाडीने विद्यमान आमदार,खासदार यांचा यात पराभव दिसून येत आहे.याचे कारण म्हणजे महिला भगिनींचे बचत गटाचे पाच वर्ष घटती संख्या व महिलांची कोणतीही कामे केली नाहीत.निवडणुकीच्या निमित्ताने महिला मेळावा घेवून मतांचे राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.महिलांनी या मेळाव्यातून त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे.यावर कुठलेही उत्तर विद्यमान आमदार खासदार देणार नाही याची मला खात्री आहे.मुळशी तालुक्यामध्ये महिलांचे आरोग्याचे प्रश्न तसेच महिला विकास व सशक्तीकरण विकास झालेला नाही.त्यामुळे आमदार खासदार निष्क्रिय ठरले आहेत. याउलट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब,देवेन्द्र्जी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने “शासन आपल्या दारी”कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात राबविला,त्यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे.तसेच महिलांना एस.टी प्रवास ५०% सवलतीमध्ये उपलब्ध केला.त्याचप्रमाणे शक्ती गटाच्या माध्यमातून भरघोस असे ३०,०००/ रु अनुदान मिळत आहे. अशा एक ना अनेक योजना आहेत ज्याचा सर्व महिलांना लाभ मिळत आहे.
छायाचित्र : सौ कांताताई पांढरे.