सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकार व बॅकस्टेज कलाकार हतबल झाले आहेत उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे , कलेतील या सर्व घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनच्या काही गरजू कलाकारांना आर .के . लुंकड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले असून कलाकार हे समाजाचे मुख्य स्रोत आहे आज या संकट काळात समाजातील दानशूर घटकांनी पुढे येऊन कलाकार व त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे गरजेचे आहे अश्या भावना ट्रस्ट चे रमनलाल लुंकड यांनी व्यक्त केल्या तर ट्रस्ट च्या वतीने उपचार घेत असणाऱ्या रुग्ण व त्यांच्या कुटूंबियांना गैरसोय होऊ नये यासाठी रोज दोन वेळचे जेवण पुरवले जाते , तसेच ट्रस्ट संचालित पूजा डायलिसिस सेंटर मध्ये केवळ 600 रुपयात उपचार केले जातात तर विविध विविध ठिकाणी कोरोना सेंटरला ट्रस्ट च्या वतींने मदत करण्यात येत असल्याचे आर के लुंकड चॅरिटेबल ट्रस्ट चे राजेंद्र लुंकड यांनी सांगितले या प्रसंगी श्री रमनलाल लुंकड , राजेंद्र लुंकड , रवींद्र लुंकड , संजय गटागट , अक्षय लुंकड , दिनेश सुराणा , पूजा चोपडा , अजय चोपडा व ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन चे संचालक व कलाकार उपस्थित होते , अभिनेता योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आशिष लुंकड यांनी आभार मानले