रोटरी युथ एक्स्चेंजच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी मोफत सेमिनार.

Share This News

रोटरी युथ एक्स्चेंज डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या वतीने रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी पुना क्लब, पुणे कॅम्प येथे सकाळी ८.३० ते ११.३० वाजता युवकांना रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमाची माहिती देण्यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे. यात रोटरी युथ एक्स्चेंज २३-२४ चे डायरेक्टर दीपक बोधनी, परदेशातून या कार्यक्रमांतर्गत आलेल्या मुलांचे मनोगत तसेच अन्य मान्यवर युवकांना या कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.त्याचप्रमाणे यात सहभागी झालेले विद्यार्थी त्यांचे अनुभव सांगतील.जागतिक पातळीवर सुमारे ९००० हून अधिक तरुण तरुणी सहभागी होतात. रोटरीने रोटरी युथ एक्स्चेंज प्रोग्राम अशा योजनेसाठी युवकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.हा सांस्कृतिक देवाणघेवाणीचा कार्यक्रम दोन देशांमध्ये राबवला जातो आणि हा कार्यक्रम १५ ते १९ वयोमर्यादा असणा-या मुलामुलींसाठी खुला आहे. जर्मनी, फ्रांस, स्पेन, ब्राझील, मेक्सिको, आर्जेन्टिना ई देशातील मुले पुण्यात वर्षभर राहतात ह्या कार्यक्रमाची अधिक माहिती,आर्थिक अटी किंवा उलाढाली काय आहेत ? कोण सहभागी होऊ शकते आणि केव्हा ? या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि तज्ञांचे मार्गदर्शन या कार्याक्रमात दिले जाणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.नोंदणी शुल्क नाही. रजिस्ट्रेशनWhatsAppवर करायचे आहे. संपर्क रोटेरीयन डॉ. कौस्तुभ मेढेकर. मो.9822040756,वेबसाईट www.rye313.org अशी माहिती डायरेक्टर दीपक बोधनी,को डायरेक्टर सारिका रोडे,कन्व्हेनर कौस्तुभ मेढेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.