डायबेटिस मुक्त भारत अभियाना अंतर्गत (DIMBHA) केलेला जनजागृती मेळावा.

Share This News

पुणे (दि.२१) भारतात मधुमेह मोठ्या प्रमाणात व सर्व वयोगटात पसरला आहे. सध्याची जीवनशैली ही त्याला कारणीभूत आहे. यासाठी प्रतिबंध म्हणून DIMBHA- डायबेटीस मुक्त भारत अभियाना अंतर्गत जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते.यात तज्ञ मार्गदर्शन व या विकारांपासून सुटका झालेले नागरिक यांच्या अनुभव कथनाचा समावेश होता. सिंहगड रस्ता नवशा मारुती जवळ असलेल्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ राजेंद्र माने,राजकुमार बजाज,भूषण यंदे आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. राजेंद्र माने यांनी मधुमेह हा फक्त एकच विकार नसून तो अनेक आजार सोबत आणतो,मात्र योग्य जीवनशैली अवलंबली तर हा आजार आटोक्यातच नाही तर नाहीसा करता येतो,या साठी सर्वत्र जनजागृती हवी असे सांगितले.
छायाचित्र : जनजागृती अभियान प्रसंगी मान्यवर व सहभागी यांचे समूहचित्र.