*शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा; शिवसेना पुणे जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.*

Share This News

पुणे दि.१६: आज शिवसेना भवन पुणे येथे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, यामध्ये त्यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्या त्या स्थानिक भागातील परिस्थिती समजून घेतली. जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी याकरिता सर्वांनी सोशल मीडियावर स्वतःचे खाते सुरू केले पाहिजे, यामध्ये खास करून ट्विटर, इंस्टा यांसारख्या समाजमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. लवकरच महायुतीच्या सर्व महिलांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. कोणीही नाराज न होता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी एकजुटीने सर्व महायुतींच्या ऊमेदवारांचा प्रचार करायचा असे यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

शिवसेना पुणे महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बाळासाहेब भवन पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी जिल्हा प्रमुख शैलाताई पाचपुते, कांताताई पांढरे आणि संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे यांनी मनोगत मांडले.  याप्रसंगी शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, *शिवसेना महिला आघाडीच्या पुणे शहर*
महिला सह संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शहर प्रमुख पूजा रावेतकर, *शिरूर महिला संपर्क प्रमुख*
सारिका पवार,जि. प्रमुख मनिषा परांडे ,
*मावळ महिला संपर्क प्रमुख*
शैला पाचपुते, पिंपरी चिंचवड महिला शहर प्रमुख सरिता साने ,
*बारामती लोकसभा महिला संपर्क प्रमुख*
गितांजली ढोणे,
*भोर वेल्हा मुळशी महिला जिल्हा प्रमुख*
कांता पांढरे , लातुर महिला संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी ,
शिवसेना महिला पदाधिकारी
कांचन दोडे, अक्षता धुमाळ, मोहिनी कदम, सुरेखा कदम पाटील, उषाताई शेळके, प्रतिभा करडे , शिवकामगार सेना सुधिर कुरूमकर, शिवसेना पदाधिकारी संजय डोंगरे यांसह अन्य शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

*शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग समोरील ‘महालक्ष्मी’ देवीचे घेतले दर्शन*

शिवसेना महिला आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘महालक्ष्मी’ देवीचे दर्शन घेतले. येथे त्यांनी चैत्री नवरात्रीतील अष्टमीनिमीत्त  विधिवत पूजा केली आणि आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळू देत तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचे सरकार येऊ देत असे साकडे देवीला घातले. तसेच राज्यातील शेतकरी, नागरिक यांना शक्ती, उत्तम आरोग्य, सौख्य आणि यश द्यावं, अशी देवी चरणी प्रार्थना डॉ. गोऱ्हे यांनी केली.