*मी शेतकरी फाउंडेशनच्या वतीने पुण्यात “कलिंगड आणि खरबूज महोत्सवाचे” आयोजन*

Share This News

पुणे, दि. ९ मार्च: उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली की प्रत्येक परिवाला वेध लागतात ते रसदार फळे खाण्याचे. या काळात कलिंगड (टरबूज), द्राक्षे, खरबूज असे विविध फळे आवडिने खाल्ली जातात. ‘मी शेतकरी फाउंडेशन’च्या वतीने “कलिंगड आणि खरबूज महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. सामान्यत: लाल रंगाचे कलिंगड बाजारात सहज उपलब्ध असतात मात्र या महोत्सवामध्ये नागरिकांना विविध जातीची, वाणाची आणि विविध रंगांच्या कलिंगडांचा आनंद घेता येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामातील हा महोत्सव पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत सुरु असणार आहे. पुण्यातील कात्रज भागात याचे मुख्य कार्यालय असणार आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने पुणेकरांना याची घरपोच डिलीव्हरी मिळणार आहे. केवळ कलिंगड आणि खरबूजच नव्हे तर इतर फळे आणि भाजीपाला देखील ग्राहकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती मी शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत नोन यू सीडचे उपमहाव्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राष्ट्रीय विपणन व्यवस्थापक गोवर्धन अगस्ती, मी शेतकरी फाउंडेशनचे प्रसाद पवार, अनिकेत खामकर आणि सारीका सरोदे उपस्थित होते.

संजय देशमुख म्हणाले की, आम्ही कोणत्या प्रकाराची, वाणाची, जातीची फळे किंवा भाजीपाला ग्राहकांना पुरवितो याची माहिती ग्राहकांना वेळोवेळी देत असतो. त्याचबरोबर ग्राहकाने कोणती फळे किंवा भाजी खरेदी केली व कोणती करायला हवी यासाठी तीन महिन्यापर्यंतच्या सगळ्या नोंदी ठेवतो. आम्ही आमच्या शेतातून ताज्या भाज्या कमीतकमी मनुष्य हाताळणीसह ग्राहकांच्या घरी पोहोचवतो. शेतीमध्ये येणारे असंख्य समस्यांवर आम्ही वेळोवेळी शेतक-यांना मार्गदर्शन आणि सल्ला मसलत करत असतो. शेतक-यांसाठी जागतिक दर्जाची कृषी पद्धती, शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा व ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा मानके आणि सुरक्षित, आरोग्यदायी आणि निरोगी अन्न पोचवण्यासाठी मी शेतकरी फाउंडेशन कटिबद्ध आहे. अल्प-भूधारक शेतक-यांचे उत्पादन वाढीसाठी तसेच शेतक-यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळाला जावा त्याचबरोबर तेथे काम करणा-या कामगारांनादेखील योग्य मोबदला मिळावा यासाठी मी शेतकरी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असल्याचे मी शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशमुख म्हणाले.

संदीप कुलकर्णी म्हणाले की, शेतक-यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे पहिले प्राधान्य राहिले आहे. शेतक-यांचे पीक उत्पादन जास्तीत जास्त करण्याबरोबरच त्यांच्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव देण्यासाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान आणि प्रगत साहित्याचा वापर करण्याच्या दृष्टीने आम्ही शेतक-यांना प्रोत्साहीत करत असतो. कंपनीने विकसित केलेले आतून लाल आणि बाहेरुन पिवळा रंग असणारे विशाला जातीचा वाण आणि बाहेरून हिरवा मात्र आतून पिवळा असणा-या मस्तानी वाणाची लागवड करुन एका वेगळ्या शेतीची पायवाट आज शेतकरी अवलंबत आहेत. या दोन्ही वाणांबरोबर मन्नत जातीच्या कलिंगडाचीही लागवड फायदेशीर आहे.