मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून प्रस्थान
पुणे ः प्रतिनिधी जय शिवाजी जय भवानी.... छत्रपती शिवाजी महाराज की जय... एक मराठा लाख मराठा... चा जयघोष करीत मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा आयोजित मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगाव…
पुणे ः प्रतिनिधी जय शिवाजी जय भवानी.... छत्रपती शिवाजी महाराज की जय... एक मराठा लाख मराठा... चा जयघोष करीत मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा आयोजित मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगाव…
पुणे दि.३: नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होत आहे. या साहित्य संमेलनासाठी निधी कमी पडू नये यासाठी स्थानिक आमदार निधी कार्यक्रमातून निधी देण्याचे…
सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता, कोरोना महामारीतील सामाजिक मदत कार्य, नैसर्गिक आपत्ती मदत व इतर उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.सलील रत्नाकर पाटील यांना मानद डॉक्टरेट इन सोशल वर्क हा किताब प्रदान करण्यात आला,…
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या सदस्यांनी एकत्रित लाईव्ह पाहिले. यादव व्यापार भवन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार…
डॉ.गोऱ्हे यांनी श्री गिरीश प्रभुणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून यासंदर्भात दिली माहिती... पिंपरी दि ३० : नुकत्याच केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी…
पुणे : वस्तू व सेवा कर कायद्यातील वारंवार होणारे बदल थांबवावेत, जीएसटी परताव्यात सुधारणा करण्याची अनुमती द्यावी, सतत बदलांच्या अध्यादेशाचा मारा थांबवावा, नोंदणी रद्द करण्याची किंवा प्रतिबंधित करण्याचे अधिकारांचे उल्लंघन थांबवावे, अनावश्यक विलंब शुल्क आकारने थांबवावे, जीएसटीमधील ‘एचएसएन’ इ-वे बिल, इनपुट टॅक्स क्रेडिट, कॅश लेजर, क्रेडिट लेजर, अव्हेलेबल, युटीलाईज्ड क्रेडिट सेवा अशा अनेक गोष्टी सुलभ कराव्यात. याशिवाय व्यापारी आणि कर सल्लागार यांच्याकडे बघण्याचा चुकीचा दृष्टीकोन सरकारने बदलावा, अशा अनेक मागण्यांसाठी निषेध आंदोलन करत देशभरातील कर सल्लागारांनी जीएसटी भवनसमोर निदर्शने केली.
‘एक देश-एक कर-एक परतावा’, ‘जीएसटी भुगतान होगा आसान तो भारत बनेगा महान’, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नव्हे, तर ‘गलत सलत टॅक्स’, ‘हेल्पडेस्क हेल्पलेस’ अशा घोषणांनी जीएसटी भवनाचा परिसर दणाणून गेला. इतिहासात पहिल्यांदाच देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल व संबंधित घटक एकत्र येत हे निषेध आंदोलन केले. पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या नेतृत्वात ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’मार्फत शुक्रवारी देशभर प्राप्तिकर विभागाच्या (जीएसटी) मध्यवर्ती कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यात हे आंदोलन वाडिया कॉलेजजवळील जीएसटी (जुने एक्साईज ऑफिस) कार्यालयासमोर झाले. ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास आहेरकर, राष्ट्रीय समन्वयक सीए स्वप्नील मुनोत, कर सल्लागारांचे मेंटॉर गोविंद पटवर्धन, शरद सूर्यवंशी, नवनीत बोरा, सुकृत देव, व्यापारी संघटनेचे महेंद्र पितळिया, सीए डॉ. अशोककुमार पगारिया आदी उपस्थित होते.
नरेंद्र सोनावणे म्हणाले, “केंद्र सरकराने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणाली या विरोधात आमचे हे आंदोलन आहे. सरकारविरोधात किंवा कायद्याच्या विरोधात आम्ही नाहीत. कर सल्लागार, सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करताना अनेक अडचणी येताहेत. गेल्या तीन ते पांच वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. वारंवार नियम बदलण्यात येत असल्याने करप्रणाली किचकट झाली आहे. विलंब शुल्क अनावश्यक लावले जात आहे. परताव्यात चूक झाल्यास दुरुस्त करता येत नाही. जीएसटी पोर्टल व्यवस्थित चालत नाही, अशा असंख्य अडचणी आहेत. दरवर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. याच अयोग्य कर कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी हे निषेध आंदोलन आहे. भारतभरातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, २०० पेक्षा अधिक व्यापारी, कर सल्लागार संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत.”
“देशभरात विविध ठिकाणी खासदारांना यासंदर्भात निवेदने दिली असून, संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. हेच निवेदन आम्ही जीएसटी मुख्य आयुक्त यांनाही दिले आहे. लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही हे निवेदन देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने व्यापारी, कर सल्लागार, सनदी लेखापाल व संबंधित घटकांच्या अडचणी समजून घ्याव्यात व जीएसटी अंमलबजावणीत योग्य ते बदल करावेत. केलेले बदल कायम ठेवावेत, अशी आमची विनंती आहे,” असे विलास आहेरकर यांनी नमूद केले.
“कायद्यातील जाचक तरतुदींचा निषेध म्हणून सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल काळे कपडे परिधान करून, काळ्या फिती लावून निषेध केला. लहान, मध्यम व्यापाऱ्यांवरील कर कायद्याच्या पूर्ततेच्या तरतुदी कमी आणि सुसह्य कराव्यात. कायद्यात, फॉर्ममधील बदल दर वर्षी १ एप्रिलला लागू होतील, याची दक्षता घ्यावी, दुरुस्तीची सोय करावी, अशा आमच्या मागण्या आहेत. कर सल्लागार हे शासन आणि व्यापारी/उद्योजक यातील दुवा आहेत. कर सल्लागार आणि सनदी लेखापालांवर कामाचा बोझा वाढला आहे. तो कमी करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत,” असे सीए स्वप्नील मुनोत यांनी सांगितले. (more…)
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची जे.एन.यु अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ,दिल्ली येथे 'मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज' या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.नुकतेच प्रवेश परिक्षांचे निकाल जाहीर झाले…
मी टू वुई २०३४ या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. दीपक तोषणीवाल यांचा कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक सेवेसाठी कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित केले. महात्मा फुले सभागृह येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या…
७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळाच्यावतीने झेंडा वंदन व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.पिपल्स मिडिया इंडिया न्यूज पोर्टलचे संपादक राजेंद्र सोनार व सामाजिक कार्यकर्त्या छाया विजय वारभुवन यांच्या…