आरोग्याला अपायकारक व बेकायदा बेकरी – फरसण उत्पादक कारखान्यांवर कारवाईची जिल्हाधिकारी यांना मागणी निवेदन.

Share This News

पाणीपुरी शेव फरसान लाडू चिक्की आदी उत्पादने बेकायदेशीरपणे परवाना व स्वच्छता निकष न पळता बनविणारे असंख्य कारखाने पुण्यात उत्पादन व विक्री करीत असून याने नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. म्हणून अशा कारखान्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले. या शिष्टमंडळात राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर शिकलकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा कामगार अध्यक्ष भीमा जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.