शिक्रापूर – चाकण रस्ता चौफुला येथील कोव्हिड सेंटर साठी औषधे व आवश्यक साहित्य प्रदान केल्याबद्दल स्टाऊफ इंडिया प्रा.लिमिटेड कंपनीचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

Share This News

शिक्रापूर – चाकण रस्ता चौफुला येथील कोव्हिड सेंटर साठी औषधे व आवश्यक साहित्य प्रदान केल्याबद्दल स्टाऊफ इंडिया प्रा.लिमिटेड कंपनीचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी कंपनी प्रशासनाचे अरुण चौधरी, श्री अमित वाघमारे,प्रबंधक इम्तियाज मोमिन,उद्योजक सुनील कावडे उपस्थित होते. स्टाउफ इंडिया कंपनीने नेहमी अशा सामाजिक कार्यास प्राधान्य दिले आहे या प्रसंगी आगामी काळात पुणे नगर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण आरोग्य साठी कंपनीचे प्रबंध निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपिन चिरमुरे यांच्या माध्यमातून कार्य केले जाईल असे सांगितले.तसेच कंपनीने मागील आठवड्यात रेल्वे हॉस्पिटलला १० जंबो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान केले होते. आणि बीजे एस कोव्हीड सेंटरला ही कोव्हीड साहित्य प्रदान केले.