रोटरी क्लब औंध तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.

Share This News

रोटरी क्लब औंधच्या वतीने नुकताच रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात  विनिता सहादत व रो. अनींदिता नंदी यांनी औंध फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना औक्षण करून राखी बांधली तसेच औंध पोस्ट ऑफिस कर्मचारी, AIMS हॉस्पिटल औंध येथील कर्मचारी, औंध कुटी रुग्णालय कर्मचारी व वीज महामंडळ औंध येथील कर्मचारी वर्ग यांना औक्षण करून व पेढा भरवून औक्षण केले.क्लबचे सल्लागार श्री. प्रल्हाद साळुंखे संचालक यांनी या वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी स्वतः चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस नागरिकांचे रक्षण करत असतात तसेच सेवा पुरवत असतात म्हणून रोटरी क्लब औंध सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन त्यांना सन्मानीत व गौरव करून हा उपक्रम दरवर्षी आनंदाने राबवत असतो हे त्यांनी सर्व ठिकाणी नमूद केले व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी सचिव राजेंद्र शेलार यांचे समन्वय व वीज महामंडळ अधिकारी रो.पंडित दांडगे व इतर उपस्थित होते.