*इलाही जमादारांचे शेवटचे गजल गीत रसिकांच्या भेटीला* ( चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांची माहिती )

Share This News

मराठीतील महान कवी, गझलकार म्हणून इलाही जमादार यांची ओळख आहे. इलाही यांनी लिहलेल्या त्यांच्या शेवटच्या गजलवरती संगीतबद्ध केलेले गीत लवकरचं रसिकांच्या भेटीला येणार आहे. ते म्हणजे

“आत्म्याचा सौदा करूनी, जर स्वतःस विकले असते.
एकेक वीट सोन्याची, घर असे बांधले असते.”

असे गीताचे बोल असून ‘जखमा अशा सुगंधी’ या गजल संग्रहातील ही गजल असून गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी इलाही यांनी ही गजल पुन्हा शब्दांकित केली होती. हे गजल गीत संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केले आहे.

आगामी प्रदर्शित होणाऱ्या वर्तमान या चित्रपटात हे गजल गीत रसिकांना अनुभवता येणार आहे. हे गजल गीत हर्षित अभिराज व अभिलाषा चेलम यांनी गायली आहे. ही गजल रेकॉर्डिंग करताना गजलेचे गीतात रूपांतर होत असताना इलाही जमादार यांनी मोलाची साथ दिली. इलाही यांचा दिलखुलास स्वभाव त्यांचा पाहुणचार याविषयी संगीतकार हर्षित अभिराज यांनी इलाहींच्या आठवणींना उजाळा दिला.

वर्तमान चित्रपटातील हे गजल गीत लवरकचं रसिकांच्या भेटीला येणार आहे. अशी माहिती चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांनी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर हे आहेत. तर सुबोध भावे, तेजस्विनी पंडित, मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर असे कलाकार या चित्रपटात आहेत.