भागवत सप्ताह मध्ये साजरा झाला कृष्ण जन्म – नंदोत्सव.

Share This News

अंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ(इस्कॉन)च्या वतीने आयोजित श्रीमद भागवत सप्ताहात श्री कृष्ण जन्म- नंदोत्सव साजरा करण्यात आला. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या उत्सवात नंद, यशोदा गोकुळ निवासी व अन्य वेशभूषा केलेले मान्यवर उपस्थित होते. तसेच फळे,मिठाई,व विविध भेट वस्तूंची उधळण करण्यात आली. या उत्सव प्रसंगी हितेंद्र सोमाणी, भुजंगराव ओगले, प्रिती वाईकर, उल्हास किराड, सुरेश जैन, राजेश मित्तल, हंसराज किराड, खांडेलवालजी, पोपटलाल ओसवाल, संजय ओसवाल, श्री पापळ, राज मुछाल, श्रीकांत मुछाल, श्री रावतजी. श्री हिरनंदानी. आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र : कृष्ण नामदास महाराज,नंद,व बालकृष्ण.