लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिशनच्या वतीने परिसंवाद.

Share This News

लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे यांच्या वतीने दि. १०/०२/२०२४ रोजी “हॉटेल शेरेटन ग्रॅड” बंडगार्डन, पुणे येथे “मूनलाईटिंग वर्क फ्रॉम होम, कौशल्य विकास आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, २०१३” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. न्यायमूर्ती श्री. संदीप मारणे, उच्च न्यायालय, मुंबई हे या परिसंवादास उपस्थित राहणार असून त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. सदर परिसंवादात कामगार क्षेत्रातील व औद्योगिक जगतातील सध्याच्या अडचणी व वेगेवेगळया विषयांवर या क्षेत्राशी निगडीत मान्यवर वक्ते आपले अनुभव व विचार श्रोत्यांसमोर मांडून मार्गदर्शन करतील. अशी माहिती लेबर लॉ प्रेक्टिशनर्स असोसिएशन, पुणे यांचे अध्यक्ष अॅड. अजय देशपांडे व अॅड. प्रशांत भट हयांनी दिली आहे.

नोंदणी आणि माहितीकरीता संपर्क

९८२२१९०२०८

punellpa@gmail.com, ९८२२०६५६३४,