श्री महालक्ष्मी मंदिरात शिवशक्ती ग्रुपच्यावतीने चंडी होम यज्ञ संपन्न.

Share This News

श्री महालक्ष्मी मंदिर सोमवार पेठ येथे शिवशक्ती ग्रुपच्या वतीने चंडीहोम यज्ञ करण्यात आला. या यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे यात पूर्णाहुती (शेवटची आहुती) ही मूल्यवान साडी असते व या पूर्णाहुती मध्ये महिला सुद्धा सहभागी असतात. गेल्या १२ वर्षापासून दरवर्षी हा होम करण्यात येतो. यज्ञाचे पौरोहित्य नटराज शास्त्री, भवरजी महाराज यांनी केले. या प्रसंगी दाम्पत्य पुजा (ज्येष्ठ पतीपत्नी),व कुमारी पुजा केली जाते. या कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टी-सरपंच डॉ.गुरुदत्त शर्मा, डॉ.अरुण जोशी, शरद नर्तेकर, शिवशक्ती ग्रुपच्या मल्लिका अय्यर, शांती अय्यर, राजलक्ष्मी अय्यर, मीना अय्यर आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवशक्ती ग्रुपच्या महिला सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.

छायाचित्र : पूर्णाहुती देतांना नटराज शास्त्री मल्लिका अय्यर व महिलावर्ग.