“ई टेंडरिंगचा उद्योगांनी जास्त वापर करावा व व्यवसाय वाढवावा.”- मकरंद शेरकर.

Share This News

उद्योजक व व्यवसायिकांनी ई टेंडरिंगचा अधिक वापर करून आपल्या उद्योग व्यवसायात प्रगति करावी. पारंपरिक टेंडर पेक्षा खर्च कमी,पारदर्शकता व प्रसार याचा लाभ मिळतो असे प्रतिपादन उद्योजक मकरंद शेरकर यांनी केले.मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आयोजित मार्गदर्शन सत्रात ते मार्ग दर्शन करत होते.तसेच चंदू चव्हाण यांनी सहकार क्षेत्रा मुळे कसे लाभ होवू शकतात याचे विस्तृत मार्गदर्शन केले.पुनाक्लब येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष निसार सागर,उपाध्यक्ष नासिर शेख,सेक्रेटरी जावेद सय्यद आदी मान्यवरांच्या बरोबरच उद्योजक,युवक युवती उपस्थित होते.

छायाचित्र : मार्गदर्शन करतांना मकरंद शेरकर.