प्रतिष्ठित “नारी शक्ती सन्मान” पुण्याच्या वैशाली पाटील यांना प्रदान शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा 

Share This News

पुणे प्रतिनिधी : स्वर्ण भारत परिवार, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित “नारी शक्ती सन्मान” पुण्याच्या कुसुमवत्सल संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या समजाप्रती असलेल्या कार्याची दखल घेत, दिनांक १० मार्च २०२१ रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी स्वर्ण भारत परिवाराचे अध्यक्ष पियुषजी पंडित, क्रेया या संस्थेचे सीईओ डॉ. कुलजीतजी उप्पल, प्रेरक वक्त्या, शिक्ष्याविषरद आणि लेखिका डॉ. परीन सोमाणी, नवी दिल्ली वस्तू व सेवा कर आयुक्त श्यामसुंदर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक मान्यवरांच्या सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, स्वर्ण भारत परिवाराचे प्रथमतः आभार व्यक्त केले. त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला सन्मानित केले.  पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर नक्कीच आहे. परंतु, अशा सन्मानाने समाजात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा, ऊर्जा देखील मिळते.