*चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला उकळत्या तेलातून 5 रुपयाचे नाणं बाहेर काढण्याची शिक्षेवरून,असं उकळत्या तेलातून नाण काढणं अशी शिक्षा देणारी लोक आहेत यांच्यावरती कारवाई व निर्बंध आवश्यक ना-डॅा.नीलम गोऱ्हे.*

Share This News

दि. २१ मुंबई/ पुणे, नुकताच सामाजिक माध्यमां वरती एक व्हिडिओ आलेला आहे.त्याच्यामध्ये एका महिलेला तिथे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी त्याने उकळत्या तेलातून नाणे काढावं अशा प्रकारची शिक्षा समाजकंटक फर्मावतानी दिसत आहे. या व्हिडिओचा मी शोध घेतला आम्हाला कृष्णा चांदगुडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी यांची माहिती काढली त्यामधून सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या बावची गावामधली घटना आहे असे कळले आहे. व्हिडीओचा तपशील तपासून त्याची चौकशी करावी.
ही शिक्षा एक प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराचा एक प्रकार आहे, म्हणून मी राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांच्याकडे मी माहिती कळविलेले आहे व तसे पत्र दिलेले आहे. असे उकळत्या तेलातून नाणे काढणे अशी शिक्षा देणारे समाज कंटक आहेत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. महिलेला संरक्षण आणि सहकार्य मिळाले पाहिजे, समुपदेशन मिळाला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबर असा व्हिडिओ काढत असताना दहशत पसरवण्याचा हेतू होता त्याच्यावरती पण कुठेतरी लोकांच्या मनात जागृती करणारे निर्णय झाले. लवकरच गृहमंत्र्यांनी या प्रश्नावर बैठक घ्यावी सुचवले आहे. येणार्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा मंजूर झाला तर अशा घटनांना काही प्रमाणामध्ये पायबंद बसू शकेल असेही मत डॉ. नीलम गोर्हेंनी व्यक्त केले आहे.