*मंथन परिषदेच्या पूर्वतयारीची बैठक उत्साहात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार*

Share This News

*हवामान बदलासंदर्भातील यूनोने निश्चित केलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयांना साध्य करण्याच्या उद्देशाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने फेब्रुवारी महिन्यात ‘मंथन परिषद’ घेण्यात येणार आहे*.या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.८ जानेवारी) राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, पर्यावरण तज्ज्ञ व अभ्यासकांची बैठक पार पडली.
संपर्क, मुंबई व स्त्री आधार केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंथन परिषदेचे नियोजन केले जात आहे. या परिषदेची पूर्वतयारी म्हणून डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यतेखाली बैठक पार पडली. संपर्कच्या मेधा कुळकर्णी, मृणालिनी जोग, आम्ही आमच्या आरोग्यासाठी अभियानाच्या शुभदा देशमुख(गडचिरोली)महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे व केशवसीता ट्रस्टचे संचालक शिरीष फडतरे, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगांवकर(लातुर) , सामाजिक कार्यकर्ते अरूण शिवकर,(रायगड) जनविकास संस्थेचे रमेश भिसे(बीड)कम्युनिटी फॉरेस्ट राईट‌्सचे दिलीप गोडे(नागपूर), स्त्री आधार केंद्र(पुणें) अपर्णा पाठक, विभावरी कांबळे, उपसभापती कार्यालयातर्फे योगेश जाधव (लातुर) आणि उपसभापती गोऱ्हे यांचे स्वीय सहाय्यक प्रविण सोनवणे (नागपूर)यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला.
हवामानबदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी, या बदलाच्या प्रक्रियेची गती रोखण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत, या बाबतीत ‘मंथन’ परिषदेद्वारे जागृती तसेच कृती कार्यक्रमाची निश्चिती केली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या परिषदेचे पूर्वनियोजन करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने बैठक पार पडली. राज्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींनी याप्रसंगी आपली भूमिका स्पष्ट केली. यासह विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले. मंथन परिषद ही दूरगामी परिणाम करणारी व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त करत ही परिषद यशस्वी करण्याचा निर्धार केला.
————-
सामुहिक प्रयत्नांतून चित्र पालटू
वसुंधरेचे निसर्गरूपी वैभव जपण्यासाठी राज्य शासन माझी वसुंधरा अभियानासह इतर उपक्रमांतून प्रयत्नशील आहेच. या कामाला गती देण्यासाठी राज्यभरातील सामाजिक संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी मंथन परिषद उपयुक्त ठरेल. सामुहिक प्रयत्नांतून हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासह या बदलाच्या प्रक्रियेची गती करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करूया, असे विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.