राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी काशीफ सय्यद.

Share This News

पुणे (दि.६) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी सामजिक कार्यकर्ते काशीफ सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली.त्याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शरद पवार यांचे निवासस्थान मोदी बाग येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, सलीम लाल खान, रोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नवनियुक्त उपाध्यक्ष काशीफ सय्यद यांनी आगामी काळात पक्ष वाढी बरोबरच तरुणांच्या समस्या सोडविण्याचे ही कार्य करणार असल्याचे सांगितले.
छायाचित्र : काशीफ सय्यद