रोटरी क्लब कर्वेनगर च्या वतीने रिक्षा ड्रायव्हर्सना सुरक्षा रक्षक बॅनर,मास्क,औषध वाटप.

Share This News

रोटरी क्लब ऑफ कर्वेनगरच्यावतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालया बाहेरील रिक्षा स्टँड मधील रिक्षा ड्रायव्हर्सना सुरक्षा रक्षक बॅनर, करोना प्रतिबंधक औषध, रोटरी मास्क वाटप करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रिक्षा स्टँड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्षा रो.सौ.अॅड.आकांक्षा पुराणिक, उपाध्यक्ष रो.अभय पुराणिक, सचिव रो राघव कुलकर्णी, सौ.शिल्पा कुलकर्णी, डॉ.दिलीप कुलकर्णी, अर्णव पुराणिक, संजीव पावगी, नितिन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अध्यक्षा रो.आकांक्षा पुराणिक यांनी “दीनानाथ रुग्णालया बाहेर रुग्णांची ये जा सुरू असते. म्हणूनच प्रतिबंधक म्हणून सुरक्षा रक्षक बॅनर, रोटरी मास्क, व औषध वाटप करून त्यांना औषधाची माहिती देवून पुणेकर नागरिकांची कोरोना पासून बचाव करण्यासाठी हे जागृती अभियान केले. रोटरी प्रांत ३१३१ चे हे अभियान असून यात रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगरने सक्रिय सहभाग घेतला आहे”. असे संगितले.    

छायाचित्र :रिक्षा ड्रायव्हर्सना वाटप करताना मान्यवर.