*संकल्प तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न!*

Share This News

येरवडा: महात्मा गांधीनगर येथील बहुउद्देशीय हॉल येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्थेचे कालकथित सदस्य आशुतोष ढसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त दिव्य दृष्टी फाउंडेशन तसेच नाना पालकर स्मृती चिकित्सालय व एस पी एफ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र व दंत चिकित्सक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ११० नागरिकांनी सहभाग नोंदविला, या वेळी दंत चिकित्सक डॉ. स्नेहा पराडकर, डॉ सत्यजित, व नेत्र चिकित्सक डॉ. अनुज पडोळ, डॉ स्नेहा कुंडू,यांनी नागरिकांची तपासणी करून आरोग्य विषयक सल्ला दिला.

या कार्यक्रमासाठी नगरसेवक राहुल भंडारे, शैलेश राजगुरू, डॉ धनंजय जाधव, अक्षय साळवे,प्रशांत मोरे,राहुल हजारे, अभिजीत वाघचौरे,संतोष सुकाळे , संतोष मोरे, अरुण बेंगळे, अभिजित रोकडे, प्रसाद वाघमारे,निलेश वायदंडे,सुनिकेत साळवे, प्रकाश पंडित, मंगेश साळसकर, रोहन लाखवडे, प्रशांत शिंदे, हर्षद पाडळे, आकाश जाधव,सनी पवार,मनोज ठोकळ, ऋषिकेश गवळी, शुभम चव्हाण, सचिन खंकाळ , निखिल भंडारे, सिद्धार्थ चव्हाण, योगेश देवकर, वसीम सय्यद, तसेच वेगवेगळ्या सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन आकाश पंडित, सौरभ गवळी, विशाल भास्कर, सागर भांतळे, ऋषिकेश भिंगारदिवे, निलेश आडागळे, तुशांत सकट, यांनी केले होते.