*जादूटोणा करण्यासाठी पळवून नेलेल्या पारधी समाजातील मुलीला परत कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात स्त्री आधार केंद्राच्या पाठपुराव्याला यश* मुलीची आईने मुलीला पुण्यातील शासकीय संस्थेकडून घेऊन गेल्याची माहिती

Share This News

पुणे, ता. १८ :  उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कुटुंबियांच्या  तक्रारी अर्जानुसार तिच्या १५ वर्षीय मुलीला  आरोपी बाळू भैया भोसले,सोनू व राजू भोसले यांनी जादूटोणा करण्यासाठी  जादूटोणा करण्यासाठी पाच लाख रुपयाला विकले असल्याचे सांगितले. याबाबत स्त्री आधार केंद्राच्यावतीने तातडीने दखल घेण्यात आली. चाकण पोलिसांच्या मदतीने सदर अल्पवयीन मुलीला येरवडा येथील बाल कल्याण समिती येथे दाखल करण्यात आले आहे. आता लवकरच ही मुलगी आईसोबत तिच्या घरी जाणार असल्याने स्त्री आधार केंद्राच्या चिकाटीने केलेल्या कामाला यश मिळाल्याची भावना या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या अनिता शिंदे व आश्लेषा खंडागळे यांनी चाकण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्याशी या केस संदर्भात  सातत्याने पाठपुरावा केला.

त्यानंतर केंद्रातर्फे तिच्या आईला फोन करून याबाबत कल्पना देण्यात आली. दि.१६/०१/२०२२ रोजी तिची आई मुंबईहुन  पुण्यात तिला घेऊन जाण्यास आली आहे.

त्यानंतर दोघी संस्थेच्या कार्यालयात येणार असल्याचे सांगितले. सदर मुलीसोबत आज बोलणे झाले असता ती सुखरूप असल्याचे सांगितले. तसेच काही दिवसांनी त्या परत गावाकडे येणार असल्याचे सांगितले. *याबाबत स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार  पोलीस स्टेशन सोबत या केसच्या नियमित स्वरूपात पाठपुरावा करण्यात येणार आहे. या कार्यात विधान परिषद उपसभापती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.*  स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.