दिल्लीतील ‘टेक४ईडी’ प्रदर्शनात महाराष्ट्र पॅव्हेलियॉन

Share This News

दिल्ली शहरातील ग्रेटर नॉयडा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक४ईडी’ या विज्ञान तंत्रज्ञान विषयक शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्र पॅव्हेलियॉन उभारण्यात आला होता. महाराष्ट्र पॅव्हेलियॉनचे युती भागीदार म्हणून पुण्यातील 3C आयटी सोल्युशन्स आणि टेलीकॉम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सहभागी होती. 3C IT सोल्युशन्स, एक सिस्टम इंटिग्रेटर प्रदान करणारी कंपनी, आयटी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सेवाही प्रदान करते तसेच देशभरातील विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हायब्रिड इंटरएक्टिव्ह क्लासरूम आणि लॅबची स्थापना करते. सदर प्रदर्शनास राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० संदर्भात त्याचे धोरण निर्माते, एनसीईआरटी, इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, आखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद (एआयसीटीई) यांचे सहकार्य लाभले. आयसीटी अॅकॅडमी आणि केसी ग्लोब ईडी हे आयोजक होते. त्याशिवाय पिंपरी चिंचवड मधील पीसीआयटी, मलेशियातील रीस्किल्स, ताशी हैद्राबाद, ग्राफिक एरा विद्यापीठ, फिबोनासी सोल्युशन्स, ड्रीलबीट सॉफ्टटेक, पानिपत विद्यापीठ, डेलनेट लायब्ररी नेटवर्क, तनिष्का ग्रुपने सहभाग नोंदवला. त्या शिवाय पुण्यातील पुणे विद्यार्थी गृह (पीव्हीजी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फौंडेशन (एसपीपीयु–आरपीएफ) हे शैक्षणिक भागीदार होते. प्रदर्शनात पुणे विद्यार्थी गृहाच्या छपाई विभागास आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिरिंग या संस्थेस सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय पुणे विद्यार्थी गृहाने मलेशिअन, इंग्लंड, ऑस्ट्रेलीयन आणि दिल्लीतील केसी ग्लोबईडी या संस्थांद्वारे विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. डिजिटल लायब्ररी या विषया अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फौंडेशन (एसपीपीयु–आरपीएफ) तर्फे महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे आणि पुण्यात पुणे विद्यार्थी गृह तसेच अनेक संस्थेत काम चालू असल्याची माहिती नेहा गद्रे यांनी दिली. दिल्लीतील प्रदर्शनाचे यश पाहता महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचे प्रदर्शनाची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यादृष्टीने 3C आयटी संस्थेने पुढाकार घेण्याचे ठरविले असून या वर्षीच साधारण डिसेंबर मध्ये असेच प्रदर्शन भरविण्याची तयारी आम्ही करीत आहोत असे रणजीत मेयांगबाम यांनी व्यक्त केली. खासदार डॉ. महेश शर्मा, नॉयडा यांनी आणि रिअर अॅडमिरल आशिष कुलकर्णी यांनी प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या. प्रदर्शनात तैवान, नायजेरिया, मलेशिया तसेच भारतभरातील अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र पॅव्हेलियॉन तर्फे मणिपूर येथील दुर्गम भागातून येऊन पुण्यासारख्या शहरात आपला शैक्षणिक व्यवसायात अमिट ठसा उमटविणारे रणजीत मेयांगबाम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे सुजित नाईक यांनी सर्वांचे आभार मानले