रोटरी हडपसर सेंट्रलने केला कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार.

Share This News

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या वतीने कोरोना कालावधीमध्ये रुग्णसेवा करणार्‍या डॉ.पूनम शहा, कृष्णा बडवाणी(इंडियन ड्रायव्हर्स), व सागर भंडारी यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने गौरव करण्यात आला. शाल,श्रीफळ,मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. चिनार बँक्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डिजीएन डॉ.अनिल परमार, रोटरी क्लब हडपसर सेंट्रलचे अध्यक्ष संपत खोमणे, रो.महेंद्र लुणिया, रो वामन भुरे, रो.रंजन पराडकर, रो.शारदा लुणिया आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :सत्कार करताना मान्यवर.