गुरुपौर्णिमे निमित्त प.पू.श्री.सुधांशुजी महाराज यांचा सत्संग,गुरुपूजा व गुरुदर्शन १६ व १७ जून २०२३ रोजी

Share This News

गुरुपौर्णिमेनिमित्त विश्व जागृती मिशन पुणे मंडलच्यावतीने प.पू.श्री.सुधांशुजी महाराज यांचा सत्संग,गुरुपूजा व गुरुदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १६ जून रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू होईल. सकाळी १० ते १२ या वेळात सत्संग (प्रवचन) होईल. त्याच दिवशी संध्याकाळी ५ ते ७ या वेळात सत्संग होईल. शनिवार दिनांक १७ जून रोजी सकाळी ९.३० ते १२.३० यावेळात गुरुदर्शन, गुरुपूजन व सत्संग होईल. भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेस अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु फक्त अध्यात्मिकच नाही तर जीवनविषयक मार्गदर्शन करतो. विश्व जागृती मिशन ही संस्था धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक प्रकल्प राबविते. संस्थेच्या गोशाला देखील आहेत. हा कार्यक्रम सर्वांना मोफत खुला असून नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह या कार्यक्रमात सहभागी होवून गुरुमार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन घनश्याम झंवर(अध्यक्ष पुणे मंडल), विष्णुभगवान अग्रवाल(महामंत्री), गणेश कामठे(उपाध्यक्ष), रविंद्रनाथ द्विवेदी (संपर्क सचिव) यांनी केले आहे. 

छायाचित्र : प.पू.श्री.सुधांशुजी महाराज.