भारतात बनलेल्या पहिल्या स्वदेशी मिस्ट फॅनचे पुण्यात वितरण

Share This News

हवे सोबत थंड पाण्याचे बारीक तुषार सोडून भर उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या मिस्ट इंडिया ब्रँडच्या मिस्ट फॅन चे दोन वर्षाच्या कठीण परीक्षणानंतर काल पुणे येथे वितरण करण्यात आले. आत्तापर्यंत भारतामध्ये फक्त चायना मेकचेच मिस्ट फॅन उपलब्ध व आयात होत होते. पारंपारिक नागपूर कुलर मध्ये बऱ्याचश्या त्रुटी व तोटे असल्यामुळे मिस्ट फॅन कडे एक सशक्त पर्यावरण रक्षक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. हा मोठ्या इंडोर साठी किंवा आउटडोर साठी अतिशय उपयुक्त आहे. एक फॅन साडेतीनशे स्क्वेअर फुट जागा कव्हर करतो. मोठी कार्यालय ,मंडप ,इव्हेंट, क्रीडांगणे मोठा हॉल, हॉटेलमधील बाह्य विभाग, घरातील गच्ची ,बालकनी किंवा मोठा हॉल, घरातील बगीचा या सर्व ठिकाणी तसेच कंपन्या त्यांची कॅन्टीन, हॉस्पिटल्स ,पोल्ट्री फार्म ,गोडाऊन ,प्रोडक्शन एरिया, या सर्व ठिकाणी हा फॅन अतिशय उपयुक्त आहे. आज पर्यंत या कंपनीने लष्कराला पण खूप फॅन दिले आहेत. स्टार्ट अप कंपनी मीस्ट इंडिया या पुण्यातील कंपनीचे मिस्टिंग फॉगिंग या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले मॅनेजिंग डायरेक्टर श्री मकरंद कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रसिद्ध मिस्ट इंडिया या नावाने वितरित झालेल्या फॅनची सविस्तर माहिती दिली.