ईशरे पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी नंदकिशोर कोतकर.

Share This News

ईशरे (इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रीजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग  इंजिनियर्स) च्या अध्यक्षपदी नंदकिशोर कोतकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष विरेन्द्र बोराडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सचिवपदी सुभाष खानडे, खजिनदारपदी चेतन ठाकुर, पुढील वर्षीसाठी प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून आशुतोष जोशी यांची निवड करण्यात आली. हॉटेल टिपटॉप वाकड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मागील वर्षीचे संपूर्ण देशस्तराचे ईशरे अध्यक्ष एन.एस.चंद्रशेखर,मार्गदर्शक प्रो.अनिल कश्यप, अंशूल गुजराती आदी मान्यवरांच्या बरोबरच ईशरे पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनियुक्त अध्यक्ष नंदकिशोर कोतकर यांनी आगामी काळात कार्य तसेच सदस्य संख्या वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संगितले.   

छायाचित्र : नंदकिशोर कोतकर.