रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर पदग्रहण रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर पदग्रहण समारंभ

Share This News

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर पदग्रहण रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर पदग्रहण समारंभ नुकताच हॉटेल प्रेसिडेंट येथे मोठ्या उत्साहात पार पडला. क्लबचे मावळते अध्यक्ष रोटरियन डॉ. शोभा राव आणि मावळते सचिव रोटरियन अजय गोडबोले यांनी नियोजित अध्यक्ष रो. डॉ. मृणाल नेर्लेकर आणि रो. प्रमोद पाठक यांच्याकडे पदभार सुपूर्त केला. या प्रसंगी प्रांतपाल रो. डॉ. अनिल परमार उपस्थित होते. डॉ. शोभा राव यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीरीत्या पार पडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला, तर येत्या रोटरी वर्षात डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य, सामाजिक उन्नती आणि शांतता या धोरणांना अनुसरूनच उपक्रम राबविले जातील, याची ग्वाही डॉ. मृणाल नेर्लेकर यांनी याप्रसंगी दिली. प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरिजा यार्दी यांनी केले, तर डॉ. स्मिता जोग यांनी आभार मानले.

छायाचित्र :मान्यवर व पदाधिकारी यांचे समूहचित्र.