रोटरी क्लब ऑफ मगरपट्टा,एलाईट,G9 आणि रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल आयोजित गर्भाशयाच्या मुखाचा कर्केरोग तपासणी शिबीर हा महिलांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि संभाव्य धोके लवकर ओळखण्याच्या उद्देशाने राबवला जाणारा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. या शिबिरात मोफत तपासणी आणि सल्लामसलत करण्यात येईल, ३० ते ६५ वयोगटातील महिलांना या कार्यक्रमाचा फायदा होईल, त्यांना प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित तपासणीचे महत्व याबद्दल माहिती मिळेल. नागरिकांना आवाहन आहे की महिलांनी शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग तपासणी शिबिरास उपस्थित रहावे. वेळ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० स्थळ रायजिंग मेडिकेअर हॉस्पिटल,हॉटेल Radisson Blue च्या मागे,खराडी,पुणे उपक्रम संपूर्णपणे मोफत असून केवळ पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी साठी http://forms.gle/NaCkpN2yWU797rkf7
रोटरी क्लब मगरपट्टा एलाईट ,खराडी,तसेच G9 यांच्या वतीने २३ डिसेंबर रोजी मोफत गर्भाशयमुख कर्करोग तपासणी.
Tags: #aaj ka anand, #lokmat, #loksatta, #maharashtra times, #pudhari, #punya nagri, #rotary dist 3131, #sakal, #samna
You Might Also Like

*कुपोषण आणि भूकमारी पासून मुक्तता देशासमोर असलेल मोठे आव्हान- ना.डॉ.नीलम गोऱ्हे* *एसएनडीटी महाविद्यालयातील पोषण आणि आहार तज्ञ प्रयोगशाळेचे उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन* मनुष्याचे बौद्धिक व शारीरिक पोषण उत्तम रहाण्यासाठी एसएनडीटीच्या पोषण प्रयोगशाळेतून प्रयत्न अपेक्षित- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांना मदतीसाठी मार्गदर्शक अहवाल : रामराजे निंबाळकर* स्वयंसिध्दा अहवालाचे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले प्रकाशन: *विधवा अन एकल महिलांना अथवा त्यांच्या कुटुंबाना केवळ आर्थिक मदत मिळण्यापेक्षा सामाजिक दर्जा उंचावला जावा अशा स्वरूपाचा अहवालाचा प्रमुख निष्कर्ष : विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोऱ्हे*
