प्रेम व भक्तिमय वातावरणात श्रीमद भागवत कथा सप्ताहाची पूर्णाहुती संपन्न.

Share This News

सर्व जगाचे कल्याण व्हावे, मृत व्यक्तींना सद्गती मिळावी व सर्वांना ईश्वर प्रेमाद्वारे मुक्ती मिळावी या हेतूने आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ यांच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताह यज्ञाची पूर्णाहुती राजा परीक्षित उद्धार कथेने झाली. यावेळी सातही दिवसांच्या कथेचे संक्षिप्त समालोचन करण्यात आले. या प्रसंगी कथाकार प.पू कृष्णनामदास महाराज यांनी धर्म ही मनुष्याला ईश्वर-श्रीकृष्ण प्राप्तीकडे नेणारी नाव आहे. ईश्वर प्राप्ती झाल्यावर ती व्यक्ति धर्माच्या पलीकडे जाते म्हणजेच धर्माचा त्याग करते असे प्रतिपादन केले. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भागवत कथा संयोजन समिती सदस्य, डॉ.सदानंद पाटील, उल्हास किराड, हितेंद्र सोमाणी आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

छायाचित्र : नाम संकीर्तन करतांना प.पू कृष्णनामदास महाराज. .