श्री कृष्ण आणि रुक्मिणी विवाह सोहळा श्रीमद भागवत कथेत संपन्न.

Share This News

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ(इस्कॉन) च्या वतीने आयोजित श्रीमद भागवत सप्ताहात कृष्ण रुक्मिणी विवाह संपन्न झाला. विदर्भ येथील राजकुमारी रुक्मिणी व भगवान श्रीकृष्ण यांच्यात प्रेम होते. यासाठी कृष्णाने रुक्मिणी हरण करून विवाह केला. या प्रसंगाचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. श्री कृष्ण ,रुक्मिणी,त्यांचे नातेवाईक असे अशी वेशभूषा करून हा विवाह लावण्यात आला. व त्याप्रित्यर्थ अनेक भेटवस्तू व मिठाई वाटण्यात आली. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सत्यशीला पृथ्वीराज चव्हाण, श्री  भुजंगराव ओगले,श्री. मेहता,ज्वालासिंग व अमरसिंग,राजेंद्र गोयल,पुष्पा गोयल,श्री हिरनंदानी,पोपट ओसवाल,संजय ओसवाल. हितेंद्र सोमाणी,सुरेश खांडेलवाल, केशव प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : श्री कृष्ण व रुक्मिणी व अन्य वेशात.