*स्वर्गीय मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार ख्यातनाम अभिनेते सचिन पिळगावकर व लोकप्रिय विनोदी अभिनेते श्री समीर चौगुले यांना प्रदान*

Share This News

नटरंग अकॅडमी पुणे तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा स्वर्गीय शाहीर मधु कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार यंदाच्या वर्षी ख्यातनाम अभिनेते सचिन पिळगावकर व विनोदी अभिनेते समीर चौगुले यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे पुण्याचे खासदार आणि नटरंग संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री गिरीश बापट यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे श्री जतिन पांडे, श्री प्रणव कडेकर, श्री पुष्कर तावरे. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुहासिनी देशपांडे ,जयमाला इनामदार, ज्येष्ठ कथक नृत्य गुरु मनीषा साठे, ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्य गुरु स्वाती दातार, शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, श्री ललित जैन आदी उपस्थित होते बालगंधर्व रंगमंदिर येथे दीड हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात एक आकर्षक स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप ,व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री जतिन पांडे यांनी केले संस्थेचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी सचिन पिळगावकर व समीर चौगुले यांच्या कार्याचा गौरव केला. संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली व संस्थेच्या भविष्यातील उपक्रमाबद्दल आशावाद दर्शवला .श्री सचिन पिळगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे मनापासून कौतुक केले. केलेल्या सादरीकरणामध्ये एक व्यावसायिक दृष्टिकोन होता. कलाकारांविषयीची तळमळ होती. नेपथ्या मध्ये नटराजा चा वापर हा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सचिन पिळगावकर यांनी काढले. दुसरे पुरस्कार्थी श्री समीर चौघूले यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेतील कलाकारांनी सादर केलेल्या स्किट अर्थात प्रहसनाचं मनापासून कौतुक केलं. इतक्या लहान वयात मुलं करत असलेल्या या सादरीकरणाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आणि स्वतःच्या पुरस्कारा करता मुंबईहून आलेले त्यांचे मित्र विश्वास सोहोनी यांनी केलेल्या त्यांच्याबद्दल मदतीबद्दल मार्गदर्शना बद्दल आभार व्यक्त केले .आभार प्रदर्शन जतिन पांडे यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या दोनशेहून अधिक कलाकारांनी *कलारंग* हा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन श्री पुष्कर तावरे व श्री प्रणव खेडेकर यांनी केले होते एक आकर्षक नेपथ्य या प्रसंगी अनुभवायला मिळाले तब्बल दीड हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सर्व ज्येष्ठ कलाकारांना आत्मीयतेने साडी, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे प्रदान करून पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला .

फोटो ओळ : डावीकडून लीलाताई गांधी,सचिन पिळगावकर,गिरीश बापट,जतिन पांडे,समीर चौगुले