*शिवसेना पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांनी ना. नीलमताई गोऱ्हे यांची भेट.*

Share This News

मुंबई/पुणे दि. ४- माननिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी श्री. आदित्य शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य हे युवा उद्योजक व उच्चशिक्षित आहेत. आज आदित्य शिरोडकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती, शिवसेना उपनेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली .नीलमताई गोर्हे यांनी महावस्त्र देऊन व पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या. पुणे शहर, बारामती लोकसभा, पिंपरी-चिंचवड मनपा,शिरूर लोकसभा व जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न, सामाजिक राजकिय मुद्दयांवर चर्चा झाली .त्याच बरोबर नविन कार्यक्रमासंदर्भात कार्यपद्धती यांवर चर्चा झाली व पुढील कामासाठी शुभेच्छाही दिल्या.
आदित्य यांचे वडील श्री. राजन शिरोडकर यांचा व माझा दिर्घकाळ परिचय आहे असेही नीलमताईं गोर्हे यांनी भेटी दरम्यान नमुद केले.