“केशवसुत स्मृतिकरंडक स्वरचित काव्यस्पर्धा व काव्यकार्यशाळेचे’ आयोजन.

Share This News

विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सरस्वती मंदिर नाईट कॉलेज, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने “केशवसुत स्मृतिकरंडक स्वरचित काव्यस्पर्धा व काव्यकार्यशाळेचे’ आयोजन गुरूवार, दिनांक २१ मार्च २०२४ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिध्द साहित्यिक व लेखक मा. प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते होईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अधिसभेचे सदस्य मा. श्री. प्रसेनजित फडणवीस असणार आहेत.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ याच दिवशी सायंकाळी प्रसिध्द कवी आणि गीतकार मा. श्री. वैभव जोशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, मा. प्रा. विनायकजी आंबेकर असणार आहेत. या काव्य स्पर्धेत व काव्य कार्यशाळेत प्रसिध्द कवयित्री मा. अंजली कुलकर्णी यांचे सहभागी विद्यार्थी कविंना मार्गदर्शन होणार आहे. तसेच ज्यांनी अनेक काव्य स्पर्धेचे यशस्वीपणे परीक्षण केले आहे असे कवितांचे अभ्यासक मा. प्रा. डॉ. वर्षा तोडमल, मा. आश्लेषा महाजन आणि मा. ज्योत्स्ना चांदगुडे हे काव्य स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून तरूण विद्यार्थी आपल्या स्वरचित कविता या स्पर्धेत सादर करतात. ज्यांना आधुनिक कविंताचे जनक मानले जाते असे कवी केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांच्या नावाने राज्यस्तरावर अशाप्रकारची काव्यस्पर्धा व काव्यकार्यशाळा आयोजित करणारे आमचे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. गेल्या सतरा वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन आम्ही करीत आहोत.

स्पर्धेचे हे १८ वे वर्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मराठी साहित्य विश्वातील अनेक मान्यवरांनी आमच्या महाविद्यालयास भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये डॉ. सलील कुलकर्णी, श्री. संदीप खरे, डॉ. आनंद यादव, प्रा. फ.मु.शिंदे, कविवर्य मंगेश पांडगावकर, इलाही जमादार,र्धेचे परीक्षण करणार आहेत.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून तरूण विद्यार्थी आपल्या स्वरचित कविता या स्पर्धेत सादर करतात. ज्यांना आधुनिक कविंताचे जनक मानले जाते असे कवी केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांच्या नावाने राज्यस्तरावर अशाप्रकारची काव्यस्पर्धा व काव्यकार्यशाळा आयोजित करणारे आमचे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. गेल्या सतरा वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन आम्ही करीत आहोत.

स्पर्धेचे हे १८ वे वर्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मराठी साहित्य विश्वातील अनेक मान्यवरांनी आमच्या महाविद्यालयास भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये डॉ. सलील कुलकर्णी, श्री. संदीप खरे, डॉ. आनंद यादव, प्रा. फ.मु.शिंदे, कविवर्य मंगेश पांडगावकर, इलाही जमादार, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. अरूणा ढेरे, डॉ. सदानंद मोरे, श्री. उतम कांबळे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, श्री. प्रदिप निफाडकर, प्रा. प्रविण दवणे, डॉ. रमण रणदिवे, डॉ. माधवी वैघ, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. निलीमा गुंडी, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राजा दीक्षित, डॉ. न. म. जोशी, श्रीमती कल्पना दुधाळ, डॉ. संगीता बर्वे आणि श्री. राजन लाखे इत्यादी मान्यवरांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

समाज माध्यमामुळे मराठी साहित्याकडे घटत जाणारा तरूणाचा कल लक्षात घेता आमच्या महाविद्यालयाकडून काव्यक्षेत्राच्या नवनिर्मिती व संवर्धनासाठी होणारा अल्पसा प्रयत्न विशेष म्हणावा लागेल. यातून विद्यार्थ्यांना औपचारीक शिक्षणाबरोबर अनौपचारीक शिक्षण दिल्याचे समाधान महाविद्यालयास लाभत आहे. दरवर्षीचा महाविद्यालयाचा अनुभव लक्षात घेता महाविद्यालयीन तरूणाकडून ज्या विषयावर काव्य स्पर्धेमध्ये कविता सादर होतात यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, आर्थिक, प्रेम अशा विविध विषयाचा यामध्ये समावेश असतो. तसेच समाजातिल उपेक्षीत वर्ग स्त्रिया, जाती, शेतकरी समस्या अशा अनेक नाजूक विषयावर अतिशय बोलक्या कवितामधून प्रकाश टाकला जात असतो. यावरून आजच्या युवकांमध्ये समाजाकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा दृष्टिकोन उपजत असल्याचे दिसून येते. आमच्या महाविद्यालयाकडून हा छोटासा प्रयत्न नक्कीच दखल घेण्यासारखा आहे.

या स्पर्धेच्या निमिताने आम्ही महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाना निमंत्रणे पाठविली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत व काव्य कार्यशाळेत सहभाग नोंदवावा, यासाठी आम्ही महाविद्यालयीन तरूणांना आवाहन करीत आहोत. ही स्पर्धा महाविद्यालयाच्या ए. व्ही. हॉलमध्ये होईल.