स्टाऊफ इंडिया प्रा.लिच्यावतीने पेरणे आरोग्य केंद्रास केबिन प्रदान.

Share This News

वैद्यकीय अधिका-यांना बसण्यासाठी व ओपीडी सेवेसाठी स्टाऊफ इंडिया प्रा.लि.लोणीकंद यांच्यावतीने पेरणे येथील आरोग्य केंद्रास केबिन प्रदान करण्यात आले. तसेच सॅनिटायझर,मास्क,सर्जिकल हँड ग्लोव्हज,फेसशिल्ड,फोगर मशीन आदी साहित्य ही देण्यात आले. या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपिन चिरमुरे,पुणे जिल्हा परिषद मा.अध्यक्ष प्रदीपदादा कंद, जिल्हा परिषद सदस्य सुभाष जगताप, पंचायत समिति सदस्य मंदाकिनी कापरे, डेप्युटी जनरल मॅनेजर श्री अनंता खंडागळे, कार्यकारी सहाय्यक आणि प्रशासन श्री. अरुण चौधरी,मेडिकल ऑफिसर डॉ.नीलिमा ईनामदार,डॉ.प्रियंका सातव,सामाजिक कार्यकर्ते सुनील कवडे,सी.एम.शिंदे,पेरणे गावचे सरपंच रूपेश ठोंबरे तसेच अन्य आठ गावचे सरपंच उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना चिरमुरे यांनी कंपनी आगामी काळात सुद्धा असे कार्यक्रम पंचक्रोशीतील आरोग्य केंद्र व गरजू लोकांसाठी असे उपक्रम राबवणार आहे असे संगितले.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर.