आयटीआयच्या पदवी प्राप्त विद्यार्थ्याचा रोटरी क्लब औंधच्या वतीने सत्कार.

Share This News

औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचा पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला.यात विविध ट्रेड मधील सुमारे १८० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे औंधच्यावतीने सेक्रेटरी राजेंद्र सेलार व डॉ.विनिता सहादोत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देवून सत्कार करण्यात आला. आयटीआय औंध येथील कौशल हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी टाटा मोटर्सचे रोहित सरोज,मारुती सुझुकीचे मयूर पोकरे,रिजनल ऑफिसर उबाळे साहेब,रिजनल ऑफिसर सूर्यवंशी,नगरसेविका अर्चनाताई मुसळे,माधुकर मुसळे, आदी मान्यवर उपस्थित होते. मनोहर पवार व प्रियंका यांनी सूत्र संचालन केले.मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते. 

छायाचित्र : पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना राजेंद्र शेलार व डॉ. विनिता सहादोत.