“भरडधान्य उत्पादक शेतकरी,उप-पदार्थ उत्पादक व ग्राहक या सर्वांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाथी रोटरीच्या माध्यमातून भविष्यात एका नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्मची निर्मिती व्हावी”.- पंकज शहा.

Share This News

भरडधान्य उत्पादक शेतकरी,उपपदार्थ उत्पादक व ग्राहक या सर्वांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून भविष्यात एका नावीन्यपूर्ण  प्लॅटफॉर्मची निर्मिती व्हावी”. असे प्रतिपादन माजी प्रांतपाल पंकज शहा यांनी केले. रोटरी क्लब कॅम्प व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोटरी मिलेट जत्रा २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अल्पबचत भवन येथे संपन्न झालेल्या या एकदिवसीय यात्रा कार्यक्रम प्रसंगी कृषी संचालक विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कृषी उपसंचालक शिवकुमार सदाफुले, रोटरी प्रांत ३१३१ च्या प्रांतपाल मंजु फडके, डीजी इलेक्ट शितल शहा, रोटरी क्लब कॅम्पचे अध्यक्ष प्रदीप खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या आयोजनात इतर १५ रोटरी क्लबचा देखील सहभाग होता. एकूण स्टॉल ४५ होते. मिलेट व्यवसाय संधी पॅनल चर्चा, आरोग्यविषयक चर्चासत्रे, भरड धान्य पाककला स्पर्धा आणि भरडधान्या पासून बनविण्यात येणार्‍या  सर्व पदार्थांची चव चाखण्याची पुणेकरांना संधी मिळाली.

छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी मान्यवर.