वेसवार आर्ट गॅलेरी येथील “रोअर” या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक प्रविण एन आर यांच्या हस्ते संपन्न.

Share This News

वेसवार आर्ट गॅलेरी येथील  “रोअर” या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक प्रविण एन आर यांच्या हस्ते करण्यात आले. एम जी सेंट्रल पुणे ईस्ट स्ट्रीट येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कलकत्ता येथील सुप्रसिद्ध चित्रकार बाप्पा भौमिक, वेसवार आर्ट गॅलेरीच्या डायरेक्टर कविता भंडारी,प्रणाली हारपुडे,शैलेश भंडारी,टेरिटरी चित्रपटाचे निर्माते सचिन श्रीराम,अभिनेते संदीप कुलकर्णी व किशोर कदम. अॅड सोमनाथ हारपुडे, आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना प्रविण एन आर यांनी महाराष्ट्रास विपुल जंगल व जैविक विविधता लाभली आहे तिचे संवर्धन झाले पाहिजे असे संगितले. टेरिटरी चित्रपटातील अभिनेते यांनी बोलताना वाघ व माणूस हे दोघे एकत्र व एकमेकांचा आदर राखून राहिले पाहिजे असे संगितले. रोअर या चित्र प्रदर्शनात सुमारे १३० चित्रे असून वाघ या विषयाला समर्पित आहेत. येथील उत्पन्न हे सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार आहे असे कविता भंडारी व प्रणाली हारपुडे यांनी नमूद केले. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्वांना ते विनामूल्य खुले आहे.

छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी मान्यवर.