गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेतील निवासी विद्यार्थ्यांना स्वामी बॅग्जच्या वतीने स्वेटर व ब्लॉन्केट, वाटप.

Share This News

भोर तालुका येथील कांबरे,मिरकुटवाडी,सुतारवाडी,महादेववाडी,मळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था येथील पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना ब्लॉन्केट,सतरंजी,शालेय साहित्य व स्वेटरचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना खाऊ वाटप ही करण्यात आले. यात सह्याद्री सोशल फौंडेशनला शालेय साहित्य व ब्लॉन्केट व सतरंजी साठी वृषाली व विनय वराणसीवार यांनी सहाय्य केले.तसेच गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांना स्वामी बॅग्जच्या वतीने स्वेटरसाठी राहुल जगताप व प्रफुल्ल जगताप यांनी मदत केली. या प्रसंगी सह्याद्री फाऊंडेशनचे संतोष धावले, प्रीती घावरे, कल्याणी मोरे, अधिकराव सुतार, संतोष येरुणकर यांनी सहभाग केला.

छायाचित्र :विद्यार्थी व मान्यवर