स्वरूप संप्रदायाचे गुरुवर्य रो.डॉ.मिलिंद महाराज भोसुरे यांच्या ५ व्या नवीन “शब्दगंध” या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न

Share This News

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर , येरवडा पुणे येथे स्वरूप संप्रदायाचे गुरुवर्य रो.डॉ.मिलिंद महाराज भोसुरे यांच्या ५ व्या नवीन ” शब्दगंध ” या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोली ए पुनावाला स्कूल , हडपसर चे संस्थापक अध्यक्ष श्री बी. एन. आदमाने ,उद्योजक श्री बिपीन घोरपडे , रोटरी क्लब पुणे नगर रोड चे अध्यक्ष श्री गीताराम कदम , सेक्रेटरी श्री तुकाराम डफळ , राजेंद्र दणके , नवनाथ निचीत , माला देवी इ. व सर्व पदाधिकारी तसेच स्वरूप संप्रदायातील पुस्तक प्रकाशक सौ.ललिता अतुल नवले व सर्व शिष्यगण या कार्यक्रमास उपस्थित होते.त्याप्रसंगी डॉ. मिलिंद महाराज यांनी पुस्तकाचे महत्त्व व सामाजिक कार्याची जाणीव किती महत्वाची असते.हे नमूद केले. तसेच अध्यक्ष श्री आदमाने यांनी सुध्दा त्यांच्या शाळेच्या ५० वर्षांचा प्रवास व सामाजिक तळमळ महत्व, तसेच स्वरूप संप्रदायाच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.रो.डॉ. मिलिंद महाराज भोसुरे हे रोटरी क्लब ऑफ पुणे नगर रोड चे माजी अध्यक्ष व रोटरी डिस्ट्रिक्ट कमिटी वर असिस्टंट गव्हर्नर असोसिएट म्हणून कार्य करतात.

छायाचित्र पुस्तक प्रकाशित करताना मिलिंद भोसुरे व मान्यवर